मनाचा विजय हाच सर्व इंद्रियांचा विजय आहे……काम, क्रोध, लोभ, मोह, मंद, मत्सर, या षड-रिपूंच्या संहारा नंतरच ध्यान-योगाची सुरुवात होते………ज्या माणसाचा स्वभाव सुगंधी आहे त्याच्याशीच साधकाने मैत्री करावी……..संसारातील माणूस आणि पिंजऱ्यातील पक्षी यात काहीच फरक नाही. दोन्ही पराधीनच………..पशु – पक्षी कोणी असो, तो मुक्त होऊ शकतो. त्याच्या जवळ भक्ती , श्रद्धा , प्रेम या तिन्ही गोष्टी हव्यात. या जर सातत्याने असतील तर कुणाचाही उद्धार होईल………..मनातील विकारांच्या, वासनेच्या फांद्या तोडून टाका म्हणजे प्रकाश दिसेल……..संसारात राहून मुक्तीची वाटचाल करणे अवघड असते……….मनामध्ये विरक्तीची भावना असणे महत्वाचे आहे, फाटकी साडी नेसली म्हणजे योग सिद्ध झाला असे नाही ……… समुद्रात जशा अनंत लाटा उसळत असतात त्याप्रमाणे या मनात अनंत विचार तरंग उठत असतात. प्रत्येक काम माणसाने दृढ निश्चयाने केले पाहिजे, हे मी करणारच आणि ते होणारच हा आत्मविश्वास पाहिजे…..साधना करायला साधकच हवा, बाधक चालणार नाही…… ………प्रत्येक मनुष्य हे एक फुल आहे. आपल्या बुद्धीने, आपल्या आत्म- तेजाने ते जेंव्हा फुलते, तेंव्हा त्याचा सुगंध सहजच सभोवार पसरतो. सूर्योदय झाल्यावर दार बंद असले तरी खिडकीतून वा फटीतून प्रकाश हा येतोच आणि अंधार संपतो………देव हे सुद्धा स्तुती प्रियच आहेत. त्यांचे गुणगान करावे, त्यांची स्तुती करावी म्हणजे ते प्रसन्न होतात आणि दर्शन देतात…….ज्ञान कर्मा नुसार मिळते………शरण जाण्यात शरम कधीच नसावी……स्त्री हि नागिणी प्रमाणे असते. गारुडी पुंगी वाजवतो आणि ती नाचते पण तिला जर का डिवचले, तर मात्र ती विलक्षण चवताळते………देह हीच जमीन आहे. त्यातील अनिष्ट विचार काढून ध्यान, जप, शुद्ध आहार, शुद्ध विचार ह्या द्वारे तो शुद्ध करून त्यात ज्ञान बीज लावायचे आणि जे फळ लाभेल ते लोक कल्याणार्थ कामास लावायचे…………..ज्याने मध चाखलाय तो फुलांच्या परागाला कधी सोडणार नाही. ज्याने सत्याच्या मार्गाचा कानोसा घेतलाय तो तिकडेच जाणार………….प्रारब्ध भोगण्यास आलेला देह सुख वा दुःख भोगल्याशिवाय जाणार नाही………….नारळ हे फळ कसं आहे , वरून अगदी कठीण आहे, परंतु आंत मात्र थंडगार पाणी व मधुर खोबरे. साधकाने हि असेच असायला पाहिजे. नारळाचे कवच कठीण नसते तर ! आतल्या खोबऱ्याच संरक्षण कसं झाल असत ? ……………हे बघा , गुलाबाचे फुल किती सुरेख सुगंधी व आकर्षक आहे ! परंतु तोडावयास जावे तर काटे लागतात. साधकानेही अशीच सावधानी ठेवावी. कृतीत कोमलता, वाणीत मधुरता व स्वभावात सरळपणा पण गांभीर्य असावे……….. लहान असो वा मोठी , स्त्री हि सासरी आली कि गृहिणीच होते. अनेक सांस्कृतिक बंधनांनी समाज तिला जखडून टाकतो………… माणूस आपल्यासाठी जगत नसतो, तो दुसऱ्यांसाठी जगतो. ……..देव – भक्तांचे प्रेम अगाध, अपरिमित, अविनाशी असते ………….काळा नाग हे अहंकाराचे रूप आहे. प्रेमाचे दान करा. प्रेमाची दृष्टी व्यापक ठेवा………………. क्रोधाला जिंका, आपल्या जिव्हेला जिंका.शिव्या तोंडात येवू देवू नका. हातांनी वाईट काम करू नका. चालतांना विचार करून पाउल उचला. मनात वाईट विचार येऊ देऊ नका. साधकाला फार फार बंधने पाळावी लागतात. ……….वाईट विचारांचे माहेर घर असलेल्या मनाला शुद्ध विचारांनी भारून टाका, मनात शुद्ध विचार ठेवा. शुद्ध प्रेम ठेवा. देवाला प्रेमाने आळवा…………. मन शुध्द नि साधनशील राहिल्यास प्रभू प्राप्ती लवकर होते…………. योग्य ते खत पाणी घातल्या शिवाय सहस्त्रदल कमल फुलणार नाही.मौन, उपवास, जप, प्राणायाम, ध्यान, हे सर्व दिवसातून 6 ते 8 तास झाले पाहिजे. ………………………… कुंडलिनी जागृत झाली, मृत्यूचा अनुभव आला म्हणजे साधकाचा पुनर्जन्म झालेला असतो त्याचे शरीर शुध्द झालेले असते.

प.पू. सद्‍‍गुरु ॐ मालती देवी

कलियुगात परमेश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग (ध्यानयोग) दाखविणाऱ्या प.पू. सद्‍गुरु ॐ मालती देवी या अतुलनीय मनोनिग्रह व कठोर साधनेच्या बळावर पूर्णत्वाला पोहोचून त्यांना ‘सद्‍गुरु’ पद प्राप्त झाले. प.पू. आईंनी एकानाथांप्रमाणे नेटका प्रपंच केला, तर तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ‘ठायीच बसोनी करावा एकचित्त ‘ याप्रमाणे घरीच साधना करून अध्यात्माचे उच्च शिखर गाठले.
Read More

ध्यान मार्ग  

प. पू. आईंनी सांगितलेला ध्यान मार्ग. परमेश्वर या जगात सर्वत्र आहे तसाच तो तुमच्यात सुद्धा आहे. म्हणूनच तो बाहेर कुठेही शोधण्याऐवजी अंतर्मुख होऊन शोध घ्या. आत्मसाक्षात्कार म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय आणि ध्यानयोग हा आत्मसाक्षात्काराचा सुलभ मार्ग आहे. कलियुगात धावपळीच्या जीवनात अर्थार्जनासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कालानुरूप स्त्री व पुरुष दोघांच्याहि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
Read More

तपोवन  

संत श्रेष्ठ श्री तुलसीदासांनी ‘रामचरित मानस’ या ग्रंथात साधू- संतांना ‘ जंगम तीरथराजू’ म्हणजे चालते बोलते तीर्थराज म्हणजे प्रयागतीर्थ म्हटले आहे. ‘ तीर्थी कुर्वान्तितीर्थानि’ स्वान्तःस्थे गदाभृता (भगवत) म्हणजे संतांच्या वास्तव्याने तीर्थांना पावन असे ‘ तीर्थत्व प्राप्त होते. संत ज्या ठिकाणी राहतात. ते स्थानच तीर्थ बनते. असेच एक पावन तीर्थ ‘ॐ मालती तपोवन’. मिरज- म्हैसाळरोडवर, मिरजेपासून ७ किलो मीटर अंतरावर ‘ॐ मालती तपोवनाची’ पवित्र वस्तू आहे.
Read More