ॐ मालती तपोवनात आध्यात्मिक उन्नती करता मार्गदर्शन केले जाते व प्रत्येक संस्थेला अनिवार्य असे सामाजिक कार्य केले जाते.
अध्यात्मिक कार्य
प.पू ॐ मालती आईंनी सध्याच्या काळात अनुसरायला अवघड असा महर्षी पतंजलींनी विदित केलेला ‘अष्टांग योग’ स्वतः आचरणात आणला व साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याचे रूपांतर सहज योगात केले. प.पू ॐ मालती आईंच्या मार्गदर्शनानूसार तपोवनात अध्यात्मिक कार्य केले जाते. कितीतरी भक्त, साधक व इतर लोक तपोवनात येऊन ध्यानधारणा व साधना करतात व आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर होत आहेत.
अध्यात्मिक कार्य पीडीएफ (डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👉🏻) : Adhyatmik karya.pdf
सामाजिक कार्य
‘साधनेने दैवी शक्ती येते व दुःखी जीवांच्या सेवेनी पूर्व कर्मांचा नाश होतो. त्यासाठी ती सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे. सेवा करता करता साधकाची आत्मशुद्धी होते’.
आध्यात्मिक मार्गात ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ मानली गेली आहे. म्हणूनच ॐ मालती तपोवनातर्फे अध्यात्मिक कार्याबरोबरच विविध प्रकारचे सामाजिक कार्यही केले जाते.
सामाजिक कार्य पीडीएफ (डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👉🏻) :Saamajik karya.pdf